Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बाजार समितीत जीएसटी वादावर आज बैठक

06-Mar-2018 : सांगली / प्रतिनिधी

मागील आठवड्यात हळदीच्या बीलपट्टीवर जीएसटी कपात न करता पट्टी देण्याबाबतचा निर्णय झाला आहे, मात्र जीएसटीचा वाद अद्याप संपलेला नाही. जीएसटी कपात न करता बीले दिल्यास नोटीसा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापार्‍यांच्या मनात भीती निर्माण झाली असून या वादावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीमध्ये आज (बुधवारी) बैठक घेतली जाणार आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यातील प्रमुख हळद व सोयाबीन बाजारपेठांमध्ये अडत्यांकडून खरेदीदारांकडे बिल दिले असता, जीएसटी कपात केली जात नाही. याच धर्तीवर सांगली मार्केट यार्डातही बिले व पट्ट्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कायद्यांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतीमालाचा व्यवहार होत असेल त्या व्यवहारावर जीएसटीचा आकार नील या लिस्टमध्ये होतो. इतर बाजारपेठेप्रमाणेच बिल पट्ट्या नमुने करणे बाजारपेठेच्या हितासाठी आवश्यक असून, त्याच पध्दतीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेण्यात आला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter