Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बेकायदा वाळू नेणार्‍या चालकाकडून मंडल अधिकार्‍यांना दमदाटी

06-Mar-2018 : आटपाडी /प्रतिनिधी

खांजोडवाडी (ता.आटपाडी) येथे बेकायदेशीर वाळूने भरलेला टॅ्रक्टर तलाठी कार्यालयाकडे घेवून चला म्हटल्यावर तलाठी व मंडल अधिकार्‍यांचा मोबाईल हिसकावून घेवून दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आटपाडी पोलीसांमध्ये बापू सुर्यवंशी (रा.खांजोडवाडी ता.आटपाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडी पोलीसांत अरूण बन्सी साळुंखे (वय ५३, मंडल अधिकारी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत आटपाडी पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खांजोडवाडी (ता.आटपाडी) गावाजवळ बिगर नंबरचा टॅ्रक्टर ट्रॉली व लाल रंगाची बोलेरो गाडी घेवून बापू सुर्यवंशी व एक अनोळखी इसम अवैधरित्या वाळू घेवून निघाले होते.

यावेळी मंडल अधिकारी अरूण साळुंखे व उत्तम जानकर यांनी चौकशी केली असता फिर्यादी व तलाठी यांना दमदाटी करून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आटपाडी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पी.एस.आय.सोनवलकर करीत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter