Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जतमध्ये दोघा पुतण्यांचा चुलत्यावर चाकूहल्ला

06-Mar-2018 : जत / प्रतिनिधी

जत शहरातील प्रांत कार्यालयाजवळ दोघा पुतण्यांनी घरगुती कारणावरून चुलत्याला मारहाण करून त्याच्यावर चाकुने हल्ला केला. यात नसिर राजासाहेब शेख (वय ४८, रा.जत) हे जखमी झाले असून त्यांना मिरजेच्या शासकीय रूग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेबाबत जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते, तर पोलिसांनी अमीर शेख व नवशाद शेख या दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दोन्ही शेख कुटुंबांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter