Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सावळजमध्ये सख्ख्या भावंडांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू

10-Mar-2018 : तासगाव / प्रतिनिधी

सावळज (ता. तासगाव) येथे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे निखील शिवानंद व्हळकल्ले (वय ६ वर्षे) आणि श्रावणी शिवानंद व्हळकल्ले (वय ३ वर्षे) ही सख्ख्यी भावंडे दगावली आहेत. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. मृत भावंडे ही मजुरीसाठी येऊन राहिलेल्या कर्नाटकातील अलकनूर (ता. रायबाग जि. बेळगाव) येथील कुटुंबातील आहेत. रात्री उशिरा तासगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

या चिमुरड्या बालकांची आई सुजाता गेल्या दहा ते बारा वर्षांपासून मजुरीसाठी सावळज येथे येऊन राहिलेल्या आहेत. शनिवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे मजुरीसाठी गेल्या होत्या.

सकाळी अकराच्या सुमारास निखील आणि श्रावणी ही भावंडे घरासमोरील अंगणात खेळत होती. अचानकच श्रावणीला उलट्या होऊ लागल्या. ही गोष्ट तिच्या आजीच्या लक्षात आली. शेजार्‍यांच्या मदतीने आजी श्रावणीला खासगी रुग्णालयात घेऊन गेल्या. परंतु डॉक्टरांनी तिला सांगलीला घेऊन जा, असे सांगितले. सांगलीच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. शेजारील मंडळी श्रावणीला उपचारासाठी घेऊन गेले असताना दरम्यानच्या काळात तोंडाला फेस येऊन निखील सुद्धा उलट्या करू लागला होता.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter