Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मुख्यमंत्र्यांचा कवठेमहांकाळचा दौरा रद्द न्यायालयाचे होणार औपचारिक उद्घाटन

10-Mar-2018 : सांगली / प्रतिनिधी

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा रद्द झाला असून सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाची आता केवळ औपचारिकता राहिली आहे.

राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांचे मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दि. ९ मार्च रोजी निधन झाले होते. डॉ. कदम हे विद्यमान आमदार असल्याने शासकीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी आज रविवारी मुख्यमंत्री येणार होतेे. आ. डॉ. कदम यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांचा सांगली जिल्हा दौरा रद्द झाला आहे. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ येथे शेतकरी मेळावा आयोजीत केला होता. त्याचप्रमाणे निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपतर्फे नागरी सत्कार होणार होता. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे. विजयनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार होते. त्यांचा दौरा रद्द झाल्याने न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिल रमाणी यांच्या हस्ते न्या. रणजीत मोरे, न्या. संदीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी सकाळी ११ वा. होणार आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter