Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जयसिंगपूर येथे अपघात ः चौघे गंभीर

10-Mar-2018 : जयसिंगपूर / प्रतिनिधी

कोल्हापूर-सांगली महामार्गावर थांबलेल्या मालवाहू ट्रकला वडाप रिक्षाने धडक दिल्याने या अपघातात रिक्षातील चौघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास येथील माणगावे पेट्रोल पंपाजवळ घडली.

जखमींमध्ये रामकिशोर रावत (रा. उत्तरप्रदेश, सध्या तारांगण हॉटेल), निंगाप्पा कांबळे (रा. ऐनापूर, कर्नाटक) यांच्यासह २२ वर्षांची तरुणी व एक रिक्षा चालक असा चौघांचा समावेश आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, वडाप वाहतुकीची रिक्षा प्रवासी घेऊन जयसिंगपूरहून हातकणंगलेच्या दिशेने निघाली होती. माणगावे पेट्रोलपंपाजवळ ट्रक रस्त्यातच थांबला होता. या थांबलेल्या ट्रकला वडाप वाहतूक करणार्‍या रिक्षाने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षातील चौघेजण जखमी झाले. जखमींपैकी काहींना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात तर काहींना १०८ रुग्णवाहिकेतून सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter