Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सोनसळच्या वाघाला साश्रूनयनांनी निरोप

10-Mar-2018 : कडेगाव / प्रतिनिधी

जिल्ह्यासह राज्यात विधायक कामांचा डोंगर उभा करून लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेले व जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले लोकनेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता मावळत्या सूर्याच्या साक्षीने व लाखोंच्या जनसागराच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र डॉ. विश्‍वजीत कदम यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. लोकमान्य नेत्याच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित जनसागर गलबलून गेला. अनेकांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. सोनहिरा खोर्‍याचा वाघ गेला. साहेब हे चौरंगीनाथ, डोंगराई, सागरेश्‍वर चरणी विलीन झाले. रक्षाविसर्जन विधी सोमवारी दि. १२ रोजी सकाळी १० वाजता वांगी येथे होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे मुंबईच्या लिलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या डॉ. पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शुक्रवार रात्रीपासून पलूस-कडेगावसह सांगली जिल्हा सुन्न झाला होता. डॉ. कदम हे आपल्यातून निघून गेले आहेत. हे सत्य स्वीकारण्याची कोणचाही मानसिक तयारी झाली नव्हती. शुक्रवारी रात्रीपासून कडेगाव व परिसरात राज्यभरातून त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

पतंगराव कदम यांचे पार्थिव शनिवारी पहाटे पासून त्यांच्या पुणे येथील सिंहगड या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी २ वाजून ३० मिनिटांच्यापर्यंच पुणे धनकवडी येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून सोनसळ या त्यांच्या जन्मगावी पार्थिव आणण्यात आले. त्याठिकाणी ग्रामस्थांनी व कुटुंबीय व नातेवाईक यांनी डॉ. कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी ४ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास डॉ. कदम यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी सोनहिरा कारखान्याच्या कार्यस्थळावर आणण्यात आले. त्यानंतर लाखोंच्या जनसागरामध्ये शासकीय इतमामात डॉ. कदम यांच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यविधी करण्यात आला. डॉ. पतंगराव कदम यांना शेवटचे बघण्यासाठी सकाळपासून सांयकाळपर्यंत ऐन उन्हात लाखो लोक बसले होते. उपस्थित जनसमुदायास आमदार मोहनराव कदम व युवक नेते डॉ. जितेश कदम यांनी शांततेचे आवाहन केले. यावेळी डॉ. कदम यांच्या लाखो चाहत्यांच्यासह राज्याच्या कानाकोपर्‍यातून मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषेदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा ब्रार, खासदार राजीव सातव, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, खासदार संजयकाका पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार अनिल बाबर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सतेज पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार भारत भालके, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सदाशिव पाटील, दीपक साळुंखे, प्रकाश शेंडगे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन दिलीप पाटील, वसंतदादा कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, वैभव पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, क्रांती कारखान्याचे चेअरमन अरूण लाड, जतचे नेते विक्रम सावंत, माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी खासदार निवेदिता माने, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते,

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter