Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मनपा क्षेत्रात ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार : गळवेवाडी प्रकरणातील संशयिताची नार्को टेस्ट होणार

12-Mar-2018 : सांगली / प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील गळवेवाडीत बालिकेवर झालेला लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी संशयिताची नार्को टेस्ट घेण्यासाठी परवानगी मिळाली असून लवकरच ती घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान सांगली, मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात ८० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलीस व मनपा अधिकार्‍यांचे संयुक्त पथक नेमण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

गळवेवाडी येथील बालिकेच्या खून प्रकरणी त्यातील संशयितांच्या नार्को चाचणीस न्यायालयाची परवानगी मिळाली असून त्यांची मुंबईमध्ये नार्को चाचणी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आठवर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. ७ जानेवारी २०१८ रोजी ही दुर्देवी घटना घडली होती. तिचा खून करून मृतदेह ४० फूट खोल कोरड्या विहिरीत फेकून दिला होता. आटपाडीमध्ये या प्रकरणावरून तीव्र आंदोलने झाली होती.

ते पुढे म्हणाले, शहरात वाहतुकीला शिस्त लागावी या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठिकाणी सिग्नल बसविण्यात येणार आहे. आमराई रोड, लक्ष्मी मंदिर रोड, विजयनगर. शाहू चौक, शांतीबन यासह अन्य ठिकाणांचा या मध्ये समावेश आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये ८० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याबाबतची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. डीपीडीसीतून त्याला मंजुरी मिळाली आहे. नंबर प्लेट ओळखणारे कॅमेरेही त्यामध्ये असतील. नंबर वरून ते वाहन कोणाचे आहे. हे समजेल. शहरामध्ये अतिक्रमण ही समस्या मोठी असून अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांची कायमस्वरूपी संयुक्त टीम बनविण्यात येणार आहे. शहरात अनेक ग्रुप आहेत, त्या ग्रुपच्या माध्यमातून काही अवैध गोष्टी आणि प्रकरणे होतात त्यामुळे ग्रुप मोडीत काढणार आहे. गुन्हेगार वर्दीतील असो अथवा वर्दीच्या बाहेरचा त्याची गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. विविध पोलिस ठाण्यात तक्रार करणार्‍या व्यक्तीला आमच्या कार्यालयातून फोन करून काही त्रास झाला का? याची विचारणा केली जाते. तीन महिन्यांमध्ये चोरीचे १९ मोबाईल रिकव्हर केले आहेत. शहर सुधारणेसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. नागज फाट्यावरून वाळूची होणारी तस्करी रोखण्यासाठी आम्ही तेथे टीम ठेवली असून प्रत्येक १५ दिवसाला त्यांना बदलण्यात येते. विविध ठिकाणी छापे टाकून बेकायदा दारू विक्री करणार्‍या २०३ जणांना अटक केली

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter