Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
चंदूकाका सराफ पेढीचा आज वर्धापनदिन

09-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

येथील चंदूकाका सराफ पेढीचा पहिला वर्धापनदिन बुधवार, दि. १० ऑक्टोबर रोजी विविध योजना, लकी ड्रॉ आणि ट्रेंडी, फॅशनेबल दागिन्यांचा खजिना खुला करून साजरा होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त आणि दसरा-दिवाळीच्या निमित्ताने खास घडणावळीचे आणि अत्याधुनिक स्त्रियांच्या पसंतीस उतरणारे लेटेस्ट दागिने चंदूकाका सराफ पेढीत सजले आहेत.

वर्धापन दिनानिमित्त महिला-ंसाठी खास भिशीची योजना सुरू करण्यात आली आहे. जी दहा महिन्यांसाठी आहे. सुरवात एक हजार रूपयापासून असून पुढे कितीही रक्कम भरण्याची मुभा आहे. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच डाय-मंडच्या दागिने खरेदीवरही बक्षिस योजना आहे. बुधवारच्या गुंतवणुकीवर सोन्याचे नाणे बक्षिस देण्यात येणार आहे. नवरात्रीसाठी ‘साव्या’ कलेक्शन हे सिल्व्हर ज्वेलरीवर ऑक्साईड पॉलीश केलेले आधुनिक दागिने चंदूकाका सराफ पेढीने सांगलीकरांसाठी आणले आहेत. या शिवाय नेकलेस, टॉप, झुमके यांची सरस डिझाईन्स उपलब्ध केली आहेत. खास दिवाळी निमित्त ‘डिल की दिवाळी’ ही ऑफर योजना राबवण्यात येत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter