Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बुलेटच्या डिक्कीतून ९४ हजार लांबविले

09-Oct-2018 : तासगाव/ प्रतिनिधी

तासगाव नगरपालिकेच्या आवारात लावलेल्या बुलेट गाडीच्या डिक्कीतून ९४ हजारांची चोरी झाली. हा प्रकार सोमवारी सकाळी साडेअकरा ते पाचच्या दरम्यान घडला. या प्रकरणी आनंदा सखाराम साळुंखे यांनी अज्ञाताविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती-नुसार आनंदा साळुंखे यांनी सोमवारी नगरपालिकेच्या आवारात बुलेट (क्र. एम.एच.१० बि व्ही.८४९९) ही सकाळी ११ वाजता लावली होती व आपल्या कामासाठी ते निघून गेले.काम झाल्यावर त्यांनी येऊन पाहिले असता त्यांच्या गाडीतील रोकड गायब होती. शोधाशोध करूनही ती सापडली नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. नगरपालिकेत सीसीटीव्ही असूनही चोरी झाल्याने खळबळ उडाली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter