Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
भरधाव कारच्या धडकेत रिक्षाचालक ठार

09-Oct-2018 : कोल्हापूर / प्रतिनिधी

लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ चौकात भरधाव कारने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालक जागीच ठार झाला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात रिक्षातील अन्य तीन प्रवासी जखमी झाले. फारूक महंमद इसाक शेख (वय ४६, रा. अकबर मोहल्ला परिसर) असे ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. महेश लिंबाजी मोरे, मुजाक हिरडे (दोघेही रा. गांधीनगर) अशी जखमींची नावे आहेत.

फारूख शेख हे आझाद चौक ते गांधीनगर मार्गावर वडाप करत होते. रात्री अकराच्या सुमारास ते प्रवासी घेऊन कोंडाओळच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी दसरा चौकातून उमा टॉकीजकडे जाणार्‍या कारने कोंडाओळ सिग्नलजवळ शेख यांच्या रिक्षाला (क्र.एम.एच.०९-सीडब्ल्यू-२५८४) धडक दिली. यात शेख यांचा जागेवरच मृत्यू झाला तर इतर प्रवासी रिक्षातून बाहेर फेकले गेले. या मार्गावरून जाणार्‍या अस्लम शेख या रिक्षाचालकाने जखमींना स्वतःच्या रिक्षातून सीपीआरमध्ये आणले. शेख यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणले, पण उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter