Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
हायवेसाठी जमीन संपादनाला जबरदस्ती झाल्यास विरोध - आ.विश्‍वजीत कदम यांचा इशारा
News Image

09-Oct-2018 : पलूस / प्रतिनिधी

गुहागर - विजापूर महामार्ग होण्यासाठी कोणाचाही विरोध नसताना लोकांना विश्‍वासात न घेता जमिनी संपादित करणे तसेच बेसुमार वृक्षतोड सुरू असून नियम धाब्यावर बसवून जमीनी संपादित करणे सुरू आहे त्यावर कहर म्हणजे शेतकर्‍यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल केले जात आहेत, हे प्रकार थांबवून लोकांना विश्‍वासात घेऊन महामार्गाचे काम करावे अन्यथा या कामाला विरोध करण्यासाठी मी सर्वांच्या पुढे असेन असा इशारा आ.विश्‍वजीत कदम यांनी पलूस येथे विश्रामगृहावर आयोजित पलूस शहर व्यापारी संघटना व बांबवडे, घोगाव, कुंडल परिसरातील शेतकरी, महामार्गाचे अभियंता व संबंधीत भूसंपादन अधिकार्‍यांच्या बैठकीत केले.

महामार्गाबाबत विविध शंका दूर करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैेठकीस महेंद्रअप्पा लाड, नगराध्यक्ष राजाराम सदामते, पलूस बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, गट नेते सुहास पुदाले, विक्रम पाटील, नगरसेवक संदीप सीसाळ, व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष कुमार माळी, शहर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter