Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
रेठरेधरण येथे वृध्दावर कुर्‍हाडीने हल्ला : एकास अटक

09-Oct-2018 : इस्लामपूर / प्रतिनिधी

रेठरेधरण (ता.वाळवा) येथे खुल्या जागेच्या वादातून जगन्नाथ धोंडी धुमाळ (वय ७२) यांच्या हातावर कुर्‍हाडीने वार करून खूनी हल्ला केल्याप्रकरणी अय्याज मेहबुब मुलाणी यास इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधिशांनी गुरूवार दि.११ ऑक्टोंबरपर्यंत मुलाणी यास पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की , धुमाळ यांच्या घराच्या बाजूस असणार्‍या खुल्या जागेतून गावातील लोक ये-जा करत असत. खासगी मोजणीत ही जागा मोहन घाडगे व सयाजी धुमाळ यांच्याकडे आल्याने त्यांच्या हद्दी निश्‍चित करून पायवाट बंद करण्यात आली. त्यामुळे अय्याज मुलाणी हा चिडून होता. शनिवार दि. ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास धुमाळ हे घरासमोरील कट्ट्यावर बोलत बसले होते. त्यावेळी अय्याज मुलाणी हा कुर्‍हाड घेवून तेथे आला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter