Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगली व कुपवाडमध्ये आज अपुरा पाणीपुरवठा

09-Oct-2018 : सांगली /प्रतिनिधी

जॅकवेलवरील वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी उपसा झाला नाही. त्यामुळे बुधवारी सांगली व कुपवाड शहरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्ये यांनी दिली.

महापालिकेच्या जॅकवेलवरील विद्युत पुरवठा दर मंगळवारी खंडीत होतो. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. महाआघाडीच्या सत्तेत चार कोटी रूपये खर्चून एक्स्प्रेस फिडरद्वारे स्वतंत्र उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांवरून पर्यायी कनेक्शन घेण्यात आले, मात्र याचा परिणाम शून्य होत आहे. सत्ताधारी भाजपने याबाबत बैठकादेखील घेतल्या, मात्र विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कर्नाळ रस्त्यावरील पाणी उपसा करणार्‍या जॅकवेलचा पाणीपुरवठा ठप्प झाला.

त्यामुळे पाणी उपसा आणि माळबंगला येथे पाणी शुध्दिकरण केंद्रही बंद राहिले. सायंकाळी पाचनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर सांगली व कुपवाडमधील पाणीटाक्या भरण्याचे काम सुरू झाले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter