Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
वांगी येथे स्वाईन फ्लूसदृश्य आजाराने महिलेचा बळी
News Image

09-Oct-2018 : कडेगाव /प्रतिनिधी

वांगी (ता. कडेगाव) येथील सौ. वंदना दिनकर जाधव (वय ४५ वर्षे ) यांचा स्वाईन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला .

मागील महिन्यात आनंदराव बोडरे याचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला . त्यामूळे वांगी परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वंदना जाधव यांना ताप, खोकला या आजारावर ३० दिवसांपुर्वी त्यांनी वांगी येथे खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले, मात्र त्रास कमी होत नसल्यामुळे त्यांना कराड येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही त्यांचा त्रास कमी होत नसल्यामुळे त्यांना २५ दिवसांपुर्वी पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर वंदना जाधव यांना स्वाईन फ्लूसदृश आजार झाला असल्याचे निदर्शनास येताच त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र सौ.जाधव यांना श्‍वसनाचा जास्तच त्रास होवून त्यांची प्रकृती गंभीर बनली व सोमवार दि ८ रोजी त्याचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर वांगी येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter