Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
इस्लामपुरात स्कूल बस - दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार

11-Oct-2018 : इस्लामपूर / प्रतिनिधी

एमआयडीसी परिसरात स्कूल बस व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माणिक रंगराव गायकवाड (वय ५८) यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , गुरूवार दि. ११ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास माणिक गायकवाड हे मोटरसायकलवरून इस्लामपूर एमआयडीसीतून शहराकडे निघाले होते. हॉटेल अमोलसमोर दुचाकी व स्कूल बसचा अपघात झाला. या अपघातात माणिक गायकवाड हे गंभीर जखमी झाले. रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या बाबतची वर्दी जालिंदर बाबूराव गायकवाड यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. माणिक गायकवाड हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. शुक्रवार दि. १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter