Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा
News Image

11-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारने अच्छे दिन व स्वस्ताईचे गाजर दाखवून सत्ता मिळविली. मात्र चार वर्षांत महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर गाजर वाटप आंदोलन केले. पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षात आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारने पेट्रोल-डिझेलचा दर पाच रुपये कमी करीत दरवाढीचा सपाटा सुरू ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला चांगल्याच झळा लागत आहेत. त्याचा निषेध म्हणून युवकांनी आंदोलन केले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter