Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त

11-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

विशेष पोलीस पथकाने साखर कारखान्यासमोर ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला.

रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य असा १ लाख ६६ हजार ९९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ९ जणांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पो.ना.सूरज पाटील, पो.शि. सचिन फडतरे यांना रोहन ऑनलाईन सेंटर या बंद असलेल्या दुकानाच्या गाळ्यात बेकायदा ऑनलाईन जुगार लॉटरी व व्हिडीओ गेम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेथे रवि संगाप्पा कांबळे (वय ३०, रा. दत्तनगर, कर्नाळ रोड), अनिल संगाप्पा कांबळे (वय २८, रा. दत्तनगर, कर्नाळ रोड) यांनी विनापरवाना बेकायदा ‘प्ले बुक’ नावाच्या अंकावर पैसे लावण्याचे जुगार केंद्र लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू केल्याचे आढळून आले. तेथे सावन मोहन केकडे (वय २४), विजय दिनकर भोरे (वय २४), यावेळी बोलताना युवकचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मंडळींनी जनतेला अच्छे दिन आणण्याचे आश्‍वासन देत सत्ता मिळविली, मात्र गेल्या चार वर्षांत जनता महागाईत होरपळत चालली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

वास्तविक प्रतिबॅरेल ७०-७५ डॉलर कच्च्या तेलाचे दर असताना पेट्रोल, डिझेल शंभरीकडे झेपावत आहे. याबाबत जनक्षोभ उसळल्यानंतर गेल्या आठवड्यात पेट्रोल पाच रुपये, तर डिझेल अडीच रुपये कमी झाले. परंतु गेल्या दीड-दोन महिन्यात ते तब्बल २० रुपयांहून अधिक वाढविले आहे हे जनता विसरलेली नाही. शिवाय आता पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ होत चालली आहे. हे जनतेला न परवडणारे आहे. त्यामुळे शासनाने पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास २० ते ५० रुपये प्रतिलिटर दर कमी होईल, असा दावा मंगेश चव्हाण यांनी केला.

सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष योगेश राणे म्हणाले, कर वाढीतून लुटलेला पैसा भाजप निवडणुकीसाठी फंड म्हणून गोळा करीत आहे. दुसरीकडे राफेल लढाऊ विमान खरेदीतही हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे अच्छे दिन जनतेसाठी नाहीत तर भाजपच्या लुटारुंसाठी आलेत हे जनतेने ओळखले आहे. जनता आता गप्प बसणार नाही. भाजपला निवडणुकीत धडा शिकवेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या आंदोलनात मनपातील विरोधी पक्ष नेते सतीश साखळकर, युवक उपाध्यक्ष विनायक कोळेकर, सुफियान पठाण, मयुरेश पेडणेकर, अमर निंबाळकर, मयूर बांगर, अमित पारेकर, उदय पवार आदी सहभागी झाले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter