Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त

11-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

विशेष पोलीस पथकाने साखर कारखान्यासमोर ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा उद्ध्वस्त केला.

रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य असा १ लाख ६६ हजार ९९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ९ जणांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पो.ना.सूरज पाटील, पो.शि. सचिन फडतरे यांना रोहन ऑनलाईन सेंटर या बंद असलेल्या दुकानाच्या गाळ्यात बेकायदा ऑनलाईन जुगार लॉटरी व व्हिडीओ गेम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेथे रवि संगाप्पा कांबळे (वय ३०, रा. दत्तनगर, कर्नाळ रोड), अनिल संगाप्पा कांबळे (वय २८, रा. दत्तनगर, कर्नाळ रोड) यांनी विनापरवाना बेकायदा ‘प्ले बुक’ नावाच्या अंकावर पैसे लावण्याचे जुगार केंद्र लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू केल्याचे आढळून आले. तेथे सावन मोहन केकडे (वय २४), विजय दिनकर भोरे (वय २४), गणेश नारायण दुबळे (वय २७), महावीर विनायक कांबळे (वय २५), प्रकाश सुरेश कोरे (वय २९), अमर रमेश सदाकळे (वय ३४), निवृत्ती कृष्णा ऐवळे (वय ६२) हे सातजण ऑनलाईन जुगार खेळत असताना आढळून झाले. पोना सचिन सनदी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक अशोक वीरकर यांच्या नियोजनानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, सूरज पाटील, तेजस डांगे, सचिन सनदी, सचिन फडतरे, लक्ष्मण कौजलगी, श्रीपाद शिंदे, दत्ता तुरेवाले, हणमंत देवकर यांनी केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter