13-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी
प्रभागामध्ये जहागीरदारी करत ठाण मांडून बसलेल्या स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी शनिवारी केल्या. दोन वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकांसह २६ स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात स्वच्छतेचे तीनतेरा झाले आहेत. भटकी जनावरे देखील वाढली आहेत. नगरसेवकांच्या देखील अनेक तक्रारी येत आहेत. मात्र आरोग्य विभागाकडून गांभीर्य घेतले जात नाही. त्यामुळे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी स्वच्छतेला शिस्त लावण्यासाठी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव यांच्याकडे मुख्यालयात एनजीटीचा कार्यभार दिला आहे.
|