Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पडळकर-शेंडगे वादावर गणपतराव देशमुख करणार मध्यस्थी

13-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

आरेवाडीत धनगर समाजाच्या दसरा मेळाव्यावरून माजी आमदार प्रकाश शेंडगे व गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष टोकला गेला असून पडळकर यांनी ढालगाव हद्दीत तर शेंडगे यांनी नागज हद्दीत मेळावा घेण्यासाठी जागा निश्‍चित केली आहे. या दोन मेळाव्यामुळे समाजात फूट पडली आहे. आता धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते सांगोला विधानसभेचे आ. गणपतराव देशमुख या दोन नेत्यांमध्ये मध्यस्थी करणार असल्याचे वृत्त आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, याचा पाठपुरावा व्हावा व समाजाला एक व्यासपीठ मिळावे म्हणून आरेवाडीतील बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या बनात गेल्या दोन वर्षांपासून धनगर समाजाचा दसरा मेळावा होतो. यावर्षी देखील मंगळवारी (दि. १६) आरेवाडी येथे दसरा मेळावा होणार आहे. मात्र या मेळाव्यावरून माजी आमदार प्रकाश शेंडगे व गोपीचंद पडळकर यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. गोपीचंद पडळकर यांनी या मेळाव्यासाठी गुजरात येथील पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेेते हार्दिक पटेल यांना निमंत्रण दिले आहे. यावरून प्रकाश शेंडगे नाराज झाले आहेत. त्यांनी स्वतंत्र मेळाव्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मेळाव्यासाठी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निमंत्रण दिले आहे.

प्रकाश शेंडगे व गोपीचंद पडळकर यांच्या गटाचे दोन मेळावे होणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter