Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
हनीट्रॅपमध्ये अडकवून लंगरपेठमधील डॉक्टरला सव्वा लाखाला लुबाडले

13-Oct-2018 : एकास अटक

मिरज / प्रतिनिधी

कवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथे राहणारे सुदर्शन घेरडे (वय ३३) यांना एका एक बाल अपचारी महिलेने फोन करून बोलावून त्यांना नृसिंहवाडीला घेऊन जात असताना महिलेसोबत असलेल्या पाच ते सहा जणांनी जबरदस्तीने त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये दमदाटी व भीती दाखवून घेतले होते. याबाबत सुदर्शन घेरडे यांनी गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली. दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी मिरज एमआयडीसी येथील अलंकार कॉलनीत राहणारा प्रकाश विठ्ठल शिंदे (वय ३३) याला मिशन हॉस्पिटल चौकात अटक केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत. आणखी पाचजणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुदर्शन घेरडे हे मानवी साखळी पूर्व तयारीसाठी मिरजेत बैठकीसाठी आले होते. बैठकीदरम्यान त्यांच्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आला. मला माझे दात स्वच्छ करायचे आहेत, असे तिने सांगितले. त्यावेळी घेरडे यांनी मी डॉक्टर नसून फिजीशियन आहे, असे सांगितले. तसेच माझी पत्नी ही डेन्टल केअरच्या डॉक्टर आहेत, असे घेरडे यांनी त्या अनोळखी महिलेला सांगितले. त्यानंतर घेरडे यांनी मोबाईल कट केला. काही वेळाने परत त्या महिलेचा फोन आला. घेरडे हे फोन उचलत नव्हते तसेच त्यांच्या व्हॉटस्अपवर फोन उचलण्याचा मॅसेज येत होता. नंतर घेरडे यांनी त्या अनोळखी महिलेचा फोन उचलला त्या महिलेने घेरडे यांना तुम्हाला भेटायचे आहे मी मिरज एस. टी. स्टॅडवर थांबते असे सांगितले.

घेरडे यांनी मला वारंवार फोन करणारी महिला कोण आहे हे पाण्यासाठी ते एस. टी. स्टॅन्डवर गेले. तेथे ती महिला भेटली. भेटल्यानंतर त्या महिलेने घेरडे यांच्या गाडीमध्ये बसल्यानंतर तिने नृसिंहवाडीला जाऊया तेथे बोलतो असे सांगितले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter