Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
इस्लामपुरात एटीएम फोडून साडेअकरा लाख पळविले

13-Oct-2018 : इस्लामपूर / प्रतिनिधी

चव्हाण कॉर्नर परिसरातील कोल्हापूर रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून ११ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा दरोडा अज्ञात चोरट्यांनी घातला. शनिवारी पहाटे दोन ते अडीच दरम्यान हा प्रकार घडला. चोरट्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गॅस कटर वापरून अवघ्या काही मिनिटांत मशीन कापले आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील वाघवाडी फाट्याकडे जाणार्‍या कोल्हापूर रस्त्यावरील जावेद मोमीन यांच्या गाळ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएम मशीनमध्ये सीएमएस इन्फोसेस प्रा. लि. या कंपनीमार्फत पैसे भरले जातात. पैसे भरण्याचे काम दीपक सुतार, अवधूत कुलकर्णी, अण्णासो पाटील व महेश मोरे हे कंपनीचे कर्मचारी पाहतात. १३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास जावेद मोमीन यांना एटीएमचे शटर उचकटलेले व एटीएम समोर २००० व ५०० रुपयांच्या नोटा अस्ताव्यस्तपणे पडलेल्या दिसून आल्या. त्यांनी याबाबतची माहिती भिकाजी निमकर यांना दिली. इस्लामपूर येथील कंपनीचे कस्टोडियन दीपक सुतार यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली व चोरी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. एटीएममध्ये ९ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३.५५ च्या सुमारास ७ लाख रुपये रक्कम भरणा केली होती. त्यावेळी पूर्वीची रक्कम अशी मिळून १४ लाख ५५ हजार रुपये शिल्लक होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter