Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जनआरोग्यच्या नावावर हॉस्पिटल्सची बदनामी कशासाठी?

16-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांकडून जादा रक्कम उकळण्याच्या नावावरुन जिल्ह्यातील पाच हॉस्पि-टल्सची बदनामी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जनआरोग्य योजनेत संबंधित हॉस्पि-टल्सचा समावेशच नाही, मग तपासणीचा प्रश्‍नच येत नाही. ज्या हॉस्पिटलमधून रुग्णांची लूट केली जाते, त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत ‘चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा’ प्रकार केल्याबद्दल संबंधित डॉक्टरांनी बदनामी करणार्‍यांविरोधात नाराजी व्यक्त केली, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा दिला आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजना नि:शुल्क आहे. तरीही हॉस्पिटलमध्ये रुणांकडून पैसे उकळण्याच्या तक्रारी या योजनेच्या मुंबईतील कार्यालयाकडे आल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखत घेत विभागाने योजनेतील पॅनेलवरील हॉस्पिटलची तपासणी सुरू केली. योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यातील हॉस्पिटल्सची कसून तपासणी केली होती. योजना नि:शुल्क असतानाही रुग्णांकडून तपासणी आणि सुविधांच्या नावाखाली जादा रक्कम उकळल्याचे निदर्शनास आले. औषधांसाठीही जादा दर दाखवून रुग्णांचा खिसा रिकामा केला होता, योजनेत पात्र असणार्‍या रुग्णांना नाकारण्यात आल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली. परंतू सांगली जिल्ह्यातील हॉस्पिटल्स योजनेत नाहीत, त्यांची तपासणी कशी झाली? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter