Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
संख येथे अनैतिक संबंधातून तरूणाचा खून

16-Oct-2018 : उमदी, जत / प्रतिनिधी

संख (ता.जत) गावातील व्हनगोंड वस्तीवर अनैतिक संबंधातून एकाचा मानेवर उजव्या बाजूला धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली. सिद्धगोंडा परगोंडा बिरादार (वय २५, रा. संख) असे मयत तरूणाचे नाव असून यात भरमप्पा बिराप्पा करजगी (रा.संख) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने खून केेल्याची कबुली दिली आहे. या घटनेची उमदी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

दरम्यान, घटना समजताच जत उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी संख गावातील व्हनगोंड वस्तीवर जावून पाहणी केली व तपासासंदर्भात उमदी पोलिसांना योग्य त्या सूचना दिेल्या.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter