Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
धनगर आरक्षणावरुन उत्तरे देताना खा.महात्मेंची उडाली भंबेरी

16-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

धनगर समाजाच्या एस.टी.त समावेशाच्या प्रश्‍नावर भाजपची बाजू मांडण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न करणार्‍या खासदार विकास महात्मेंची अनेक प्रश्‍नांवर भंबेरी उडाली. शेवटी स्वत:च्याच सरकारवर टीका करुन त्यांनी प्रश्‍नापासून सोडवणूक करुन घेतली. एका बाजुला भाजपमधून बाहेर पडलेले नेते गोपीचंद पडळकर यांनी मोठा मेळावा घेतला असता विकास महात्मेंनी प्रसार माध्यमांसमोर शासन प्रयत्न करेल, महिन्याभरात बैठक घ्यावी, सरकारला अल्टीमेटम दिला आहे, मुख्यमंत्री सकारात्मक अहवाल पाठवतील, अशा तकलादू शब्दांचा मारा पत्रकारांशी बोलताना केला.

ते म्हणाले, भाजप पक्षच धनगर समाजाला आरक्षण देऊ शकतो. निवडणुकीत तसे आश्‍वासन देखील दिले गेले होते, मात्र काही अडचणींमुळे विलंब झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर व धनगड जमातीबाबत अभ्यास करण्यासाठी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ कंपनी नेमली होती. तो अद्याप गोपनीयच आहे. परंतु तो जाहीर होण्यापूर्वीच आरक्षणाबाबत नकारात्मक अस-ल्याच्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. अर्थात फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे आरक्षणाबाबत सकारा-त्मक अहवाल २६ तारखेपर्यंत पाठविण्याचे आश्‍वासन दिले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter