Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
युवराज कामटेसह सहाजणांवर खुनासह १० आरोपांचा ठपका

16-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात गाजलेल्या अनिकेत कोथळे खूनप्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरिक्षक युवराज कामटे याच्यासह सहा संशयित आणि कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे याच्याविरोधात एकूण १० आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत, अशी माहिती विशेष सरकारी वकील ऍड.उज्वल निकम यांनी दिली.

कोथळे खूनप्रकरणाची सुनावणी सध्या जिल्हा न्यायालयात सुरु आहे. यापूर्वी दि.११ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. युवराज कामटे, अरुण टोणे, अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले या सर्वांवर १० आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत. प्रस्तावित करण्यात आलेल्या सर्वांवर त्यांनी अनिकेतच्या खुनाचा कट केला. केलेल्या कटानुसार अनिकेत आणि अमोल भंडारेला अटक केली. कोथळेकडून अन्य गुन्हे जबरदस्तीने कबूल करुन घेण्यासाठी मारहाण करुन खून केला. या गुन्ह्यात शिक्षा होणार आहे हे माहिती असूनही कट रचून खोटी माहिती दिली, त्याचप्रमाणे संगनमत केले असे म्हटलेले आहे. दुसर्‍या प्रस्तावित आरोपात कामटे आणि अन्य पोलीस आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांनी खून केला

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter