Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जनसंपर्कासाठी विशाल पाटील यांची अभिनव शक्कल
News Image

19-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय मंडळी आखाड्यात उतरण्याची तयारी करु लागले आहेत. साडेतीन मुहुर्तातील एक मुहुर्त म्हणून दसर्‍याच्या मुहुर्तावर कॉंग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी अभिनव शक्कल वापरली. सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या साक्षीने गुरुवारी सायंकाळी कार्यकर्त्यांसह नागरिकांना आपट्याच्या पानांव्दारे सोने वाटप करीत सार्‍यांचे लक्ष वेधले. या निमित्ताने राजकीय नेत्याने सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहून सोने वाटपाच्या नव्या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली.

सण असला की राजकीय नेते पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतात. लोकसभेच्या निवडणुका नव्या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर होणार आहेत, त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होतील. सर्वच मतदारसंघांत राजकीय नेत्यांकडून तयारी सुरु केली जात असल्याचे दिसून येते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter