Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कवठेएकंदला दारु स्फोटात सहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
News Image

19-Oct-2018 : तासगाव / प्रतिनिधी

तालुक्यातील कवठेएकंदला शुक्रवारी पहाटे ४ वाजून ५० मिनीटांनी डोक्यावर घेतलेल्या कागदी शिंगट्याचा स्फोट झाल्याने प्रणव प्रविण घाईल या सहावीत शिकणार्‍या मुलाचा जागीच मृत्यू झाला. स्फोट एवढा जबरदस्त होता की प्रणवच्या डोक्याची जाग्यावरच कवटी फुटली. गुरूवारी रात्री बारा वाजता कुटूंबियांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर पाच तासातच काळाने त्याच्यावर घाला घातला. येथील ऐतिहासिक विजयदशमी सोहळ्याला बारा वर्षीय मुलाचा वाढदिवसादिवशीच मृत्यू होण्याचे गालबोट लागले. या प्रकाराने सुरक्षेच्या चिंधड्या उडाल्या.

प्रणव कवठेएकंद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावीच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी त्याचा बारावा वाढदिवस होता. गुरूवारी रात्री कुटूंबियांनी केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. केक खाऊन प्रणव झोपी गेला होता , परंतू पहाटे कुटूंबियांनी त्याला उठविले. शेवटचे शिंगटे बाकी आहे ते डोक्यावर घेऊन आतषबाजी करण्यास सांगितले. आई - वडीलांनी खूपच आग्रह केल्याने साखर झोपेतून उठून प्रणवने डोक्यावर शिंगट घेतले. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता प्रणव आपल्या आपल्या घराजवळ डोक्यावर कागदी शिंगट घेऊन शोभेच्या दारुची आतषबाजी करत होता.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter