Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जत तालुक्यात कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या
News Image

19-Oct-2018 : जत / प्रतिनिधी

मल्लाळ (ता. जत) येथे कर्जास कंटाळून व द्राक्षबागेचे पीक वाया गेल्याने शेतकर्‍याने घरातच पिकांवर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. गोरख हणमंत काळे (वय ४५, रा. लोखंडे वस्ती, मल्लाळ) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. याबाबत भगवंत हणमंत काळे यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोरख काळे यांची मल्लाळ लोखंडे वस्तीवर तीन एकर शेतजमीन आहे. दोन एकरामध्ये २०१६ मध्ये द्राक्ष बागेचे पीक घेतले आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून चार लाख रुपयांचे तर सिद्धेश्वर सोसायटी, येळदरी यांच्याकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. गतवर्षी बागेतून जेमतेम उत्पन्न मिळाले , मात्र, यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पिके वाळून गेली. उत्पन्न शून्य असल्याने बँकेचा हप्ता भरता आला नाही.

यामुळे बँकेकडून वरचेवर गोरख यांना नोटीसा येऊ लागल्याने बँकेची रक्कम भरण्यासाठी लोकांकडून हात उसने पैसे घेऊन बँकेशी तडजोड करून काही रक्कम भरली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter