Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मनपा क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना मिळणार हक्काची पक्की घरे

24-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना शासकीय जागेत किंवा आहे त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतून हक्काची पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. तसे प्रस्ताव तयार करून महापालिकेने डिसेंबरअखेर पाठवावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्‍यांना दिल्या, तर मनपाला मंजूर झालेला शंभर कोटींचा निधी खर्च झाल्यानंतर पुन्हा भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीला पालकमंत्री सुभाष देशमुख , आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, अप्पर सचिव प्रविण परदेशी, पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपायुक्त सुनिल पवार, स्मृती पाटील, यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व योजनांची माहिती घेण्यात आली. मंत्रालयातील सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी योजनांमधील अडचणी दूर करत मार्ग काढून दिले.

या बैठकीची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिका व नगरपालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरू आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter