Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
ग्राईंडरमध्ये रूमाल अडकून फास लागल्याने वांगी येथे पेंटरचा मृत्यू

29-Oct-2018 : कडेगाव / प्रतिनिधी

वांगी (ता.कडेगांव) येथील बिल्डिंग पेंटिंग कामावेळी ग्राइंडरने भिंत पॉलिश करताना उडणार्‍या धुरळ्यासाठी तोंडावर बांधलेला रुमाल ग्राइंडरमध्ये अडकून गळ्याला फास लागल्याने रविंद्र प्रकाश कुंभार (वय २६ वर्षे ) या गावातीलच युवा कॉंन्ट्रॅक्टरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२९ आक्टोंबर ) दुपारी सव्वादोनच्या दरम्यान घडली.

या अपघाताची नोंद चिंचणी(वांगी) पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या आणि चिंचणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वांगीतील ऍड.महेंद्र बाळासाहेब देशमुख यांच्या घराचे रंगकाम करण्याचा ठेका रविंद्र प्रकाश कुंभार यांनी घेतला असून मागील चार-पाच दिवसांपासून ते या ठिकाणी रंगकाम करीत होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter