Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगली, मिरजेतील आठ हॉटेल्सवर छापे

29-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

येथील हॉटेल नवरत्नमध्ये अन्न पदार्थात सापडलेल्या किड्यानंतर अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रशासनाने सांगली, मिरजेतील आठ नामांकित हॉटेल्सवर छापे टाकून अन्नाचे नमुने जप्त करून तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.

गणेश नाष्टा सेंटर, सांगली जिमखाना रेस्टॉरंट, हॉटेल विहार, हळद भवन, बसस्थानक चौकातील द्वारका स्ट्रिट बेकरी ऍण्ड केक शॉप या सांगलीतील तर मिरजेतील हॉटेल अयोध्या, हॉटेल सुखसागर, अवनी पार्क अशा एकूण आठ हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने छापे टाकले व तेथील अन्नाचे नमुने ताब्यात घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठ-विण्यात आले आहेत. हॉटेल नवरत्नचे प्रकरण एका सजग ग्राहकाने उघड केले होते. तेव्हापासून हॉटेल बंद आहे. या घटनेनंतर अन्न औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला असून अनेक हॉटेल्स व हातगाडे प्रशासनाच्या रडारवर आहेत. शहरातील अन्न सुरक्षेसाठी विशेष पथक तयार केले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter