Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
एस.टी. बँक कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

29-Oct-2018 : सांगली / प्रतिनिधी

एस. टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकांनी सांगली शाखेचे शिपाई हबीब इसूब मुलाणी यांची सांगली येथून चिपळूण शाखेत बदली केली. चुकीच्या बदलीविरोधात मुलाणी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. विश्रामबाग पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. दरम्यान शिपाई मुलाणी यांनी संचालकांच्या मनमानी कारभाराच्या चौकशीची मागणीही केली आहे .

याबाबत शिपाई मुलाणी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एसटी बँकेत शिपाई पदावर काम करीत असताना मला २६ मे २००९ रोजी बँकेने निलंबीत केले. त्या विरोधात मी कामगार न्यायालयात दावा दाखल केला. २० एप्रिल २०१६ रोजी कामगार न्यायालयाच्या आदेशाने मला पुन्हा सेवेत रुजू करुन घेतले , तेव्हा शाखा व्यवस्थापक राहूल पुजारी यांनी मला सांगितले की तुमची बदली बँक संचालक लांब करणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter