Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कोल्हापूर-सातारा पॅसेंजरमधून पाच तोळे सोने लंपास

29-Oct-2018 : मिरज / प्रतिनिधी

कोल्हापूर-सातारा पॅसेंजरमधून लेडीज डब्यातून प्रवास करणार्‍या शुभांगी संग्राम कोळी (वय २५ , रा.त्रिमुर्ती बंगला, चिंतामणी हौसिंग सोसायटी,सांगली) यांची पर्स व पर्समध्ये ठेवलेले ९० हजार रूपयांचे ५ तोळ्यांचे गंठण , तसेच रोख ७ हजार रूपये असा एकूण ९७ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत शुभांगी कोळी यांनी रेल्वे पोलिसात फिर्याद दिली आहे.

शुभांगी कोळी या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या गांधीनगर येथे खरेदीसाठी गेल्या होत्या.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter