Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बस्तवडेत रस्त्याच्या वादावरून हाणामारी

29-Oct-2018 : तासगाव / प्रतिनिधी

तालुक्यातील बस्तवडे येथे रस्त्याच्या वादावरून दोन गटात जातीवाचक शिवीगाळ करून हाणामारीची घटना घडली.

या प्रकरणी दोन्ही गटांनी पोलीसांत परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून दोन्ही बाजूंच्या ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सुरज मारुती लोंढे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी ते बस्तवडे - गौरगाव रस्त्यावरून घोडागाडीतून जात होते. मराठी शाळेजवळ गाडी आल्यावर नेताजी जनादर्र्न सावंत हा हातात दांडके घेऊन आडवे आला. मांगानो तुम्ही या रस्त्यावरून जायचं नाही असे म्हणत शिवीगाळ केली. हा प्रकार समजताच घरातील मंडळी शिवीगाळ केली याचा जाब विचारायला त्यांच्या घरी गेल्यावर नेताजीने वडील मारुती लोंढे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले व जातीवाचक शिवीगाळ केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter