Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगली-मिरजेत होणार सुसज्ज भाजीमंडई

05-Nov-2018 : सांगली / प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शंभर कोटींच्या निधीतून नेमिनाथनगर येथे १५ कोटी खर्चून अद्यावत नाट्यगृहासह सांगली व मिरजेत सुसज्ज भाजी मंडई उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे , तसेच विस्तारीत भागात ड्रेनेजसह इतर कामे प्रस्तावित केली आहेत. सांगली शहरात ६० तर मिरजेत ४० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव लवकरच जाणार आहे. दरम्यान यामुळे रस्त्यावरील भाजी बाजार बंद करण्याच्या भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी जाहीर केला होता. राज्य शासनाकडून सत्तर टक्के निधी येणार असून तीस टक्के निधी मनपाला आपला हिस्सा म्हणून घालावा लागणार आहे. या योजनेतून कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आयुक्तांना दिले होते. त्यानुसार सत्ताधारी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, उपमहापौर धिरज सुर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील आदी पदाधिकार्‍यांनी एकत्रित बसून प्रस्ताव तयार केले आहेत. सांगली शहरासाठी ६० कोटी तर मिरज शहरासाठी ४० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे .

महापालिकेचा नेमिनाथनगर येथे खुला भूखंड आहे. या भूखंडावर अद्यावत सातशे आसन क्षमता असलेले नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. हे नाट्यगृह जागतिक दर्जाचे तसेच पूर्ण एअरकंडिशनल असणार आहे , तसेच सांगलीतील जुन्या गोकुळ नाट्यगृहाच्या जागेवर अद्यावत भाजी मंडई उभारण्यात येणार असून यासाठी सहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे. सांगली व मिरज शहरात ड्रेनेज योजना सुरू आहे. या योजनेत समाविष्ट नसलेली काही कामे आहेत. त्या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था असणे आवश्यक आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter