Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विष्णूदास भावे पुरस्काराने डॉ. मोहन आगाशे सन्मानित

05-Nov-2018 : सांगली प प्रतिनिधी

नाटक ही अशी कला आहे, जी प्रेक्षकांशिवाय पूर्णच होत नाही. प्रेक्षक हा नाटकाचा अविभाज्य अंग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले.

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे देण्यात येणारा विष्णूदास भावे पुरस्कार ९८ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती किर्ती शिलेदार यांच्या हस्ते डॉ. मोहन आगाशे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. आगाशे बोलत होते.

रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ‘सप्तसूर झंकारत बोले’ या नांदीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी केले. पुण्याच्या डॉ. शुभांगी दामले यांनी डॉ. आगाशे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. डॉ. आगाशे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासह अनेक व्यक्ती व संस्थांनी त्यांचा सत्कार केला. २५ हजार रूपये रोख, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter