Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

01-Feb-2019 : मिरज / प्रतिनिधी

येथील वखारभाग येथे राहणारी नूतन दत्तात्रय चव्हाण (वय १७) हिने राहत्या घरातील बेडरुममधील सिलींग फॅनला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ती मिरजेत १२ वी मध्ये शिकत होती. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत मुलीचे काका मोहन बापू चव्हाण यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मोहन चव्हाण हे सकाळी ड्युटीवर गेले होते, त्यांची पत्नी शिक्षिका म्हणून नोकरीस आहे. मोहन चव्हाण यांच्या भावाची मुलगी नूतन ही शिक्षणासाठी मोहन चव्हाण यांच्याकडे राहण्यास होती. नूतन ही सकाळी ८.३० वा. कॉलेजला गेली होती. कॉलेजवरून १२ वा.नूतन घरी आल्यानंतर तीने घराचा दरवाजा बंद करून घेतला. दरवाजा उघडत नसल्याने चव्हाण यांची मुले अक्षय व सौरभ यांनी नूतन दरवाजा उघड असे म्हणून हाक मारली,

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter