Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सात खासगी सावकार जेरबंद : तिघे फरारी

01-Feb-2019 : सांगली /प्रतिनिधी

व्याजाने घेतलेल्या पैशासाठी अव्वाच्या सव्वा व्याजदराने वसुली करणार्‍या खासगी सावकारांना ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दहापैकी सात खासगी सावकार जेरबंद करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले, तर तिघे खासगी सावकार अटकेच्या भितीने पसार झाले आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला.

कवठेपिरान, तुंग आणि कसबे डिग्रजमधील दहा खासगी सावकारांनी पिळवणूक केल्याप्रकरणी गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला. वसुलीसाठी शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही प्रकार घडला. या प्रकरणी संजय कल्लाप्पा टकुगडे (वय ४०, रा. जमादार गल्ली, तुंग, ता. मिरज) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. टकुगडे यांनी कवठेपिरानच्या संभाजी पाटील याच्याकडून एक लाख रूपये व्याजाने घेतले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter