Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विश्‍वजीत व मी लोकसभा लढविणार नाही

07-Mar-2019 : कडेगाव / प्रतिनिधी

आ.डॉ. विश्‍वजीत कदम व माझ्यावर लोकसभा लढविण्याबाबाबत सातत्याने दिल्लीतून दबाव येत आहे , परंतु यंदा तरी लोकसभा न लढविण्याचे आम्ही दोघांनीही ठरविल्याचे स्पष्ट करून विधानसभाच लढण्याचे संकेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

आ.डॉ.विश्‍वजीत कदम यांनी मात्र या विषयावर स्पष्टपणे बोलण्याचे टाळले. वांगी(ता.कडेगाव) येथील वांगी विकास सोसायटी च्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ.डॉ.विश्‍वजीत कदम, सोनहीरा कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, वांगीचे सरपंच डॉ. विजय होनमाने, उपसरपंच बाबासो सूर्यवंशी, सोनहिर्‍याचे व्हा.चेअरमन सयाजी धनवडे आदी प्रमुख उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, येत्या निवडणुकीत भाजपा च्या फसव्या सरकारला घालवायचे आहे. त्यामुळे या निवडणुका सोप्या नाहीत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter