Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
खलाटीत शाळकरी मुलीचा विनयभंग

07-Mar-2019 : जत / प्रतिनिधी

खलाटी येथे एकतर्फी प्रेमातून विनयभंग केल्याप्रकरणी व जाब विचारावयास गेलेल्या पिडित मुलीच्या वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी खंडू मल्हारी बनसोडे (रा.खलाटी) या तरूणाच्या विरोधात बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यांतर्गत व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजता शाळेत दुसर्‍या मुलाकडून चिठ्ठी देवून हा युवक पिडित मुलीस त्रास देत असल्याचा प्रकार शिक्षिकेच्या निदर्शनास आला. यानंतर पिडित मुलीच्या वडिलांना बोलावून घेवून त्यांना या प्रकारासंदर्भात सांगण्यात आले. पिडित मुलीने जत पोलिस ठाण्यात बनसोडेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दरम्यान, खंडू बनसोडे याला याचा जाब विचारण्यास गेलेल्या पिडित मुलींच्या वडिलांना बनसोडे याने खलाटी गावाच्या स्टॅन्डवर शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली . त्यामुळे मुलीच्या वडिलांना झालेल्या मारहाणीच्या फिर्यादीवरूनही खंडू यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी ही गावात सातवीत शिकत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter