Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
घनकचरा प्रकल्प आराखड्यावरुन स्थायी सभेत आयुक्त व नगरसेविकेत जुंपली

07-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प आराखड्यासाठी परस्पर एजन्सी नियुक्तीवरून स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका व आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्यात वाद जुंपला. प्रशासनाचे ‘वेगळे इंटरेस्ट’ असल्याचा आरोपही नगरसेविकेने केला. अखेर याप्रकरणी सभापतीनी आराखडा देणार्‍या दोन्ही कंपन्यांसोबत गुरुवारी बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याने अखेर या वादावर पडदा पडला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. हरित न्यायालयाने बडगा उगारूनही घनकचरा प्रकल्पाची अंमलबजावणी झाली नाही. त्यासाठी ४२ कोटी रुपये मनपाच्या स्क्रोल (स्थूल) खात्यावर ठेवले आहेत. मार्च २०१८ ची डेडलाईन दिली होती, पण याबाबत नेमलेल्या तज्ज्ञ समितीची एकदाही बैठक झाली नाही. यावर स्वाती शिंदे आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, मनपात सत्तांतर झाल्यानंतर २ महिन्यांपूर्वी प्रशासनाने ९ कोटी रुपयांचा या प्रकल्पांतर्गत बायोमायनिंग प्रकल्पाचा विषय आणला होता , परंतु आराखडा कालबाह्य झाल्याचे समोर आल्याने पुन्हा हा विषय थांबविण्यात आला. नवा आराखडा करण्यासाठी कोल्हापूरच्या सल्लागार एजन्सी नियुक्ती करण्यात आली. एजन्सीमार्फत एसपीए कॅपिटल ऍडव्हायझर लि. नवी दिल्ली या तज्ज्ञ कंपनीकडून आराखडाही तयार करण्यात आला आहे. त्या कंपनीने ८० कोटी रुपयांच्या आराखड्यात अंमलबजावणीसाठी ३ टक्के फी मागितली होती. प्रशासनाने चर्चेने ती २ टक्क्यांवर आणली. पुन्हा महापालिकेने ६७ कोटी रुपयांचा आराखडा करायचे सांगून ४० लाख रुपये फी देण्याचे पत्र कंपनीला दिले. ती फाईल गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तांकडे पडून आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter