Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पंपावरुन पेट्रोल, डिझेल चोरणारी अट्टल टोळी जेरबंद

07-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

पेट्रोल पंपातून मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल चोरुन धुमाकूळ घालणारी टोळी जेरबंद करण्यामध्ये सांगली पोलिसांना यश आले. गुन्हा अन्वेषण विभागाने उस्मानाबाद जिल्ह्यातील चौघांची ही टोळी गजाआड केली. त्यांनी सांगली जिल्ह्यात तासगाव, पलूस, आटपाडी तालुक्यांसह ११ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

लाला झिगा काळे (वय २४), दशरथ उर्फ शंकर मधु काळे (वय २३), तानाजी बाबश्या काळे (वय २२), शंकर सुरेश काळे (वय १९, सर्व रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीकडून तासगाव, भिलवडी, आटपाडी परिसरात ११ डिझेल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. या चौघांकडून एक ट्रक आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य असा सुमारे ११ लाख २८ हजार ५९० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पंपावरील डिझेल, पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार तपासासाठी एक खास पथक तयार करण्यात आले होते. पथकाला अशा चोर्‍या करणारी टोळी उस्मानाबाद जिल्ह्यातील असून ती जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter