Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
उदगाव येथे ट्रकखाली चिरडून तरूण ठार

08-Mar-2019 : जयसिंगपूर / प्रतिनिधी

उदगाव (ता.शिरोळ) येथे जुन्या वैरण अड्ड्यानजीक ट्रक आणि मोटरसायकलची धडक होवून या अपघातात एकजण ठार झाला, तर अन्य एकजण जखमी झाला. युनूस नूर शेख (वय ३५, रा.करचूंडी, जि.बीड) असे मृताचे नाव आहे. कुमार गजानन मगदूम (वय ४०, रा.उमळवाड, ता.शिरोळ) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की , औद्योगिक वसाहतीतून सांगलीच्या दिशेने स्क्रॅप घेवून जाणारा ट्रक (क्र.एम.एच.१० झेड ५३९) हा उदगाव येथील जुन्या वैरण अड्ड्यानजीक आला असता चिंचवाडहून आलेली मोटारसायकल (क्र.एम.एच.०९ बीएच ८६२२) व ट्रकची धडक झाली. ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून युनूस शेख हा जागीच ठार झाला. कुमार मगदूम हा जखमी झाला. अपघाताची वर्दी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली तसेच पंचनामा केला. या अपघाताची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter