Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
डॉ.पतंगराव कदम यांचा आज स्मृतीदिन

08-Mar-2019 : सांगली / प्रतिनिधी

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा पहिला स्मृतीदिन उद्या (शनिवारी) आहे. त्या निमित्त डॉ. कदम यांना सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील स्मारकाच्या ठिकाणी आदरांजली वाहण्यात येणार आहे, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांनी सांगितले.

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना येथील स्मारक परिसरात प्रथम स्मृतीदिनानिमित्त किर्तनकार चारुदत्त आफळे यांचे किर्तन, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter