Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मिरज-बेडग मार्गावर अपघात : युवक ठार

08-Mar-2019 : मिरज / प्रतिनिधी

मिरज-बेडग मार्गावर मोटरसायकल (क्र.एम.एच.४५ डब्ल्यु-५८९०) व मालवाहतूक टेंपो (क्र. एम.एच.५०-५३७२) यांची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार प्रभुसिंग मदनसिंग चव्हाण ( वय ३०, रा. सोलापूर, सध्या कोल्हापूर) हा युवक जागीच ठार झाला. तर टेंपोमधील दोघे जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभुसिंग चव्हाण हे मोटरसायकलवरून बेडगच्या दिशेने जात होते तर मिरजेकडे मालवाहतूक टेम्पो येत होता. दोन्ही वाहनांची कवठ्याच्या झाडाजवळ समोरासमोर धडक झाली. प्रभुसिंग चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोमधील रणजीत गोसावी, आकाश जाधव हे जखमी झाले . प्रभुसिंग चव्हाण हे ए.के.इंटरप्रायजेस या कुरीअर कंपनीमध्ये गेली तीन वर्षे नोकरी करत होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter