Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणारी तीन वाहने वनविभागाकडून जप्त

08-Mar-2019 : कुपवाड / वार्ताहर

वनविभागाच्या वनपरिक्षेत्र फिरते पथक, सांगली कार्यालयाच्यावतीने कुपवाड एमआयडीसी लगत असलेल्या तानंग,सावळी, मानमोडी,कांचनपूर,सोनी या गावांतील रस्त्यावरून गस्त घालत असताना गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवैध लाकूड वाहतूक करणार्‍या तीन वाहनांसह ११ लाख ८९ हजार ८५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वनपरिक्षेत्र फिरते पथक अधिकारी युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एकनाथ पारधी, वनरक्षक मारुती ढेरे, कौशल्या सातपूते यांचे पथक गुरूवारी रात्री मानमोडी ते सोनी दरम्यान गस्त घालत होते. या रस्त्यावरून संशयास्पद टेम्पो (क्र. एम.एच.०९ क्यू ३०२१) हा भरधाव वेगाने जात होता. त्यामुळे अधिकार्‍यांनी त्यास थांबवून टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये१५.६८ घनमिटर लिंब जातीचे लाकूड सापडले. अधिकार्‍यांनी टेम्पोसह १ लाख ५६ हजार ३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालक मुनाफ रुस्तुम नगारजी (वय २१ ), मालक विशाल संपतराव माने (दोघेही रा. कांचनपूर) यांचेवर कारवाई केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter