Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
डॉ.नागनाथअण्णा नायकवडी पुरस्कार विजय महाराज तनपुरेंना जाहीर

09-Mar-2019 : वाळवा / वार्ताहर

वाळवा तालुक्यातील युवा नेते वाळव्याचे माजी सरपंच, दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांचा वाढदिवस १३ मार्च रोजी वाळवा येथे साजरा होणार असून वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा वाळवा येथे आयोजित केला आहे, अशी माहिती वाढदिवस समितीचे प्रमुख राजेंद्र मुळीक, संजय अहीर, उमेश भैय्या घोरपडे, उपसरपंच पोपट अहीर, डॉ. अशोक माळी, मानाजी सापकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुक्यामध्ये बहुतांशी गावांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले आहेत. बुधवार दि. १३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या भव्य पटांगणावर नागरी सत्कार , अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे , या सोहळ्यासाठी महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्तेच गौरव नायकवडी यांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे.

या कार्यक्रमासाठी हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी, खा. संजय पाटील, आ. शिवाजीराव नाईक ,आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माजी आ. पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री विनय कोरे, आ. अनिल बाबर, नानासाहेब महाडिक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख , विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, माजी आ. दिनकर पाटील, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजप नेते शेखर इनामदार, माजी आ. नितीन शिंदे, नगरसेवक विक्रम पाटील, माजी आ. भगवान साळुंखे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार, भीमराव माने, सी.बी. पाटील, भाजप नेते वैभव शिंदे, सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नगरसेवक वैभव पवार आदी मान्यवर या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी वाळव्यात सुरू आहे, हुतात्मा संकुलातील अधिकारी, मान्यवर , कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहेत. भव्य दिव्य सत्कार समारंभ होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे राजेंद्र मुळीक यांनी सांगीतले.

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार विश्‍व शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला आहे . वाढदिवस समितीच्यावतीने शनिवारी त्याची घोषणा झाली , त्याचेही वितरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, गौरव नायकवडी यांच्या हस्ते वाळवा येथे १३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter