Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
डॉ.पतंगराव कदम यांना स्मृतिदिनानिमित्त हजारोंकडून अभिवादन

09-Mar-2019 : कडेगाव / प्रतिनिधी

राज्याचे माजी मंत्री व कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते स्व.आ. डॉ.पतंगराव कदम यांना प्रथम पुण्यस्मरण दिनी अलोट गर्दीत साश्रूनयनांनी अभिवादन करण्यात आले. स्व.डॉ. पतंगराव कदम साहेब यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी गर्दीचा महापूर उसळला होता. जड अंतकरणाने प्रत्येकजण आपल्या राजाच्या समाधीचे दर्शन घेताना दिसत होते. ‘साहेब परत या ’ अशी भावमुद्रा त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्ती च्या चेहर्‍यावर दिसत होती. त्यातच ह.भ.प. चारुदत्त आफळे महाराज जन्म, मृत्यू , आयुष्य व डॉ.कदम साहेब यांचा जीवनप्रवास उलघडत असताना मन गलबलून जात होते. समोर कदम कुटुंबिय हा सगळा प्रसंग म्हणजे काळीज चिरुन टाकणारा होता. त्यातून लोक स्वतःला सावरत आ.डॉ.विश्‍वजीत कदम व कदम कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रासह पुणे ,मुंबई व राज्याच्या विविध भागातील मान्यवर व हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यास आदरांजली वाहिली आठवणींचा महापूर दाटून आल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले.

वांगी (ता.कडेगाव) येथील डॉ.पतंगराव कदम सोनहीरा कारखाना परिसरातील स्मारक स्थळी साहेबांना अभिवादन करण्यात आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter